‘रिपोर्ताज’मुळे बातमीमागची बातमी शोधता येते, समस्येच्या मुळाशी जाता येतं आणि प्रश्नाचं खरं स्वरूप सविस्तरपणे समोर आणता येतं
हे पुस्तक करायचा विचार समोर आला, तेव्हा ते लेख आज किती सुसंगत आहेत, ही शंका सर्वप्रथम मनात आली. मग त्यानुसार तपासून पाहिलं, तेव्हा त्यातले बहुतांश विषय आजही ताजेच आहेत; किंबहुना त्यातील काही समस्या अधिकच गंभीर झाल्या आहेत, असं प्रकर्षानं जाणवलं. काही विषयांच्या बाबतीत ‘आज काय स्थिती आहे?’ असा प्रश्न मनात येणं साहजिक, म्हणून प्रत्येक लेखाच्या अखेरीस एक छोटंसं टिपण जोडलंय.......